"भाजप सरकारकडून होतेय लोकशाहीची कुचंबना", अशोक चव्हाणांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

सत्तेचा गैरवापर करून केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षड्‌यंत्र रचले आहे. भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून आज रेनिसन्स हॉटेलमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरणच केले आहे

- अशोक चव्हाण, अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मुंबई : सत्तेचा गैरवापर करून केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षड्‌यंत्र रचले आहे.

भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून रेनिसन्स हॉटेलमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरणच केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचे अपहरण करून त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबण्यात आले आहे. काँग्रसचे नेते व कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार हे या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले असताना त्यांना भेटू दिले नाही. त्याच हॉटेलमध्ये शिवकुमार यांनी स्वतःसाठी खोली आरक्षित केली होती, पण पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्येही जाऊ दिले नाही.

स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात गैर काय आहे? पण भाजप सरकार एवढ्यावरच न थांबता पोलिस दलाचा गैरवापर करून शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मंत्री नसीम खान यांना अटक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News