सोनिया गांधीं आणि राज भेटीनंतर अशोक चव्हाण म्हणतात, "विधानसभा निवडणूकीत मनसेला सोबत घेऊ"

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला आघाडीत घेण्याबाबत पक्षात भिन्नता होती. मात्र आता पक्षाचे मत परिवर्तन झाले आहे - अशोक चव्हाण

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकि बाबत राज ठाकरेंनी घेतलेल्या सोनिया गांधींच्या भेटीनंतर राजकिय वर्तुलात चर्चांना उधान आलं आहे. याच पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल मत व्यक्त केलय. लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला आघाडीत घेण्याबाबत पक्षात भिन्नता होती. मात्र आता पक्षाचे मत परिवर्तन झाले आहे. दरम्यान गरज भासल्यास आणि आघाडितील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास कॉंग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असे चव्हाण म्हणाले.  

दरम्यान पक्षअध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशातील इतर नेत्यांनीही राजीनामा द्यायला सुरुवात केली. लवकरच सर्व काही सुरळीत होईल अशी आशा चव्हान यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला पराभुत करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत आम्ही सहमत आहोत अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणूकांमध्ये मनसेला आघाडीत घेण्याबाबत साफ नकार दिला होता. मात्र आता कॉंग्रेसचा नकार हा बदलु लागल्याचे चिन्ह सध्या दिसत आहेत. वंचित ठेवुन मनसेला धुडकावून लावलेल्या कॉंग्रेससोबत राज ठाकरे आघाडी करतील का या कडे सर्वांचेच लक्ष लागुन आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत जर कॉंग्रेस आणि मनसे आघाडीत आली तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला धुळ चारणार का हे पाहायला मिळणार आहे.                   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News