अमिताभ बच्चन यांच्या आषाढी एकादशीनिमित्तानं मराठीत शुभेच्छा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

आषाढी एकादशीनिमित्तानं विठुनामाच्या गजरात लीन झालेल्या समस्त वारकऱ्यांना  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांनी मराठीत ट्विट करत महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत. विठ्ठल- रखुमाईची  कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहु दे अशी प्रार्थना बच्चन यांनी केली आहे.

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्तानं विठुनामाच्या गजरात लीन झालेल्या समस्त वारकऱ्यांना  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांनी मराठीत ट्विट करत महाराष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत. विठ्ठल- रखुमाईची  कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहु दे अशी प्रार्थना बच्चन यांनी केली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. <

>

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्व बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. 'विठूराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News