पवारांना होते पहिल्या रांगेत आसन ; राष्ट्रपती भवनाचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • शपथविधीबाबत राष्ट्रपती भवनाचा खुलासा
  • समजुतीचा गोंधळ असावा, असे मलिक यांनी केलेल्या  ट्विटमध्ये नमूद ​

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. या संदर्भात काहीतरी समजुतीचा गोंधळ झाला असावा, असा खुलासा राष्ट्रपती भवनातर्फे बुधवारी करण्यात आला. 

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या प्रसंगी पवार यांना पाचव्या रांगेतील स्थान देण्यात आल्याने त्यांनी शपथविधीस उपस्थित राहण्याचे रद्द केले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज हा खुलासा करण्यात आला. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी एका ट्विटद्वारे हा खुलासा केला. 

शपथविधीसाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी राखीव दालनातच पवार यांचे आसन राखीव ठेवण्यात आले होते व ते पहिल्या रांगेतच होते. परंतु या संदर्भात जारी करण्यात आलेल्या पासावर ‘व्ही’ असे रोमन लिपीत लिहिण्यात आले होते, असे मलिक यांनी म्हटले आहे. 

कदाचित त्यामुळे पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याची समजूत झाली असावी हा समजुतीचा गोंधळ असावा, असे मलिक यांनी केलेल्या  ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News