हे असतील, भारतीय संस्कृतीने दिलेले कलागुण...

अक्षदा पवार
Friday, 19 July 2019

भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक कलागुण दिलेले आहेत, ज्यामुळे आपण स्वतःला खुप संपन्न मानतो. आजच्या काळात ज्या कलागुणांचा उपयोग मनोरंजन व पैसा कमावण्यासाठी करण्यात येतो, त्या कलांगुणांचा मूळ उदेष हा होता की यामुळे समाजात सुरु असलेल्या वाईट विचारांचा नाश होऊन समाजाची प्रगती होईल.

भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक कलागुण दिलेले आहेत, ज्यामुळे आपण स्वतःला खुप संपन्न मानतो. आजच्या काळात ज्या कलागुणांचा उपयोग मनोरंजन व पैसा कमावण्यासाठी करण्यात येतो, त्या कलांगुणांचा मूळ उदेष हा होता की यामुळे समाजात सुरु असलेल्या वाईट विचारांचा नाश होऊन समाजाची प्रगती होईल.

चेंबूर मधील  विवेकानंद एजुकेशन सोसायटी कॉलेज ऑफ़ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या एन.एस.एस. च्या संघाने, 16 जुलै 2019 रोजी कॉलेज मध्ये प्रथमच अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या कॉलेजची नवी सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे नाव 'आरंभ' असे ठेवण्यात आले होते. कॉलेजमध्ये नव्याणे आलेल्या प्रथम वर्षाच्या व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी एक रंगमंच या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण जसे गायण, नृत्य, पथनाटक, ई. सादर करण्याची संधी देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या कलांच्या मदतीने समाजातील काही गंभीर प्रश्णांनवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. काही काळजी करण्यासारखे विषय यावेळी येथे सादर झाले जसेकी बालविवाह, युवा पिढीतिल काही गंभीर प्रश्न, झाडांची कमी होणारी संख्या, इ या सर्व गोष्टींसोबत भारतीय संस्कृति व एकत्मतेचे  ही प्रदर्शन झाले. समाजात कितिही अडचणी आल्या तरी त्यांना एकत्र येऊन आपण सामोरे जाऊ शकतो हे या वेळी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कॉलेजच्या 578 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 

सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता कन्वर, कॉलेजच्या व्यवस्थापक प्रमुख सौ.रिटा वज़िरानी,  एन.एस.एस. चे प्रोग्राम ऑफिसर श्री. विकास वारे आणि सौ.सुनिता चौधरी व अन्य कमिटी मेम्बर सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नावानुसारच खरया अर्थाने एका नविन उपक्रमाचा आरंभ येथे झाला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News