Article 370 : “पोरा, आम्ही आमचं बघून घेऊ” गंभीरचा आफ्रिदीला टोला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, अशा अर्थाचे ट्विट आफ्रिदीने केले होते. या प्रदेशात आक्रमकपणे घेण्यात येणारे निर्णय आणि येथील गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी असे आफ्रिदी म्हणाला होता.

संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, अशा अर्थाचे ट्विट आफ्रिदीने केले होते. या प्रदेशात आक्रमकपणे घेण्यात येणारे निर्णय आणि येथील गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी असे आफ्रिदी म्हणाला होता.

“संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेला त्यांचे अधिकार द्यायला हवेत. आपल्यासारखा त्यांनाही स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांची स्थापना का झाली आहे आणि ते आता झोपले आहेत का? काश्मीरमध्ये मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रामकता आणि गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मध्यस्थी करायला हवी”, असे ट्विट आफ्रिदीने केले होते.

त्यावर गौतम गंभीरने ट्विट करत टोला लगावला आहे. “मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता हा आफ्रिदीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. याबद्दल आफ्रिदीचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे, पण तो एक गोष्ट विसरला आहे, ते म्हणजे हे सारं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडतं, हे लिहिण्याचं त्याच्याकडून राहून गेलं. पोरा (आफ्रिदीला उद्देशून), तू या सगळ्याची काळजी करू नको. आम्ही आमचं बघून घेऊ, असं प्रतिउत्तर गौतम गंभीरने दिलं आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News