अल्पवयीन मेव्हणीसोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला अटक

प्रल्हाद कांबळे
Thursday, 11 July 2019

गावाकडे जायचे म्हणून अगोदर दुगाव पाटी, कुंभरगाव महादेव मंदिर, नंतर तेलंगणातील सारंगपुर व सायंकाळी बोधन येथील आपल्या खोलीवर घेवून गेला.

नांदेड :  तुझे चुलते गावाला गेले असून तुला घ्यायला मला पाठवल्याचे सांगून मोटारसायकलवर बसवून बोधन येथील रुमवर अल्पवयीन मेव्हणी सोबत भाऊजीनेच कुकर्म केल्याची घटना घडली असून. पिडीतेच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात लिंगपिसाट भाऊजीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हनमंत आनंदराव पांचाळ हा नायगाव तालुक्यातील राहेर येथील असून तो सध्या तेलंगणातील बोधन येथे सुतारकीचे काम करतो. पिडीत अल्पवयीन मुलीच्या बहीणीसोबतच हनमंत पांचाळ याचा विवाह झाला आहे. पण काही दिवसांपूर्वी हनमंतची पत्नी बिमार असल्याने तीला बिलोली तालुक्यातील खपराळा येथे पाठवून दिला.

पिडीत मुलगी ही हनमंत पांचाळ याची सख्खी मेव्हणी असून ती नायगाव येथे आपल्या चुलत्याकडे राहते व सध्या ती १२ वी शिकत आहे. मात्र ५ जुलै रोजी सकाळी ११ च्या दरम्यान हनमंत पांचाळ याने मोटारसायकल घेवून कालेजजवळ गेला व अल्पवयीन असलेल्या आपल्या मेव्हणीला तुझे चुलते गावाला गेले आसून तुला घ्यायला मला पाठवले आहेत असे सांगितले. भाऊजीच असल्याने म्हेव्हणीने मोटारसायकलवर बसून सोबत निघाली.

गावाकडे जायचे म्हणून अगोदर दुगाव पाटी, कुंभरगाव महादेव मंदिर, नंतर तेलंगणातील सारंगपुर व सायंकाळी बोधन येथील आपल्या खोलीवर घेवून गेला. गावाकडे न जाता बिलोलीकडे मोटारसायकल घेवून जात असतांना पिडीतेने विरोध केला पण गप्प बस नाही तर तुझ्या बहीणीला खतम करण्याची धमकी देवून. तोंडावर ओढणीने बांधून कुकर्म केला आणि ६ जुलै रोजी खपराळा येथे सोडून दिल्याची घटना घडली. 

चक्क भावजीनेच लहान बहीणीसारख्या असलेल्या अल्पवयीन मेव्हणीसोबत बळजबरी कुकर्म केल्याने पुर्ण फँमिलीच हादरुन गेली होती. मात्र पिडीतेच्या बहीनीने आपल्या संसाराचे काहीही होवो पण कुकर्म करणाऱ्याला सजा मिळाली पाहीजे असे सांगून कुटुंबाला धिर दिला व ९ जूलै रोजी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बलात्कारासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News