अर्जनची ‘ऑपरेशन टेरर...’ वेबसीरिज लवकरच....

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

मॅथ्यू ल्युटवेलर यांनी वेबसीरिजच्या सहनिर्मात्यासह दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटातून अभिनेता अर्जन बाजवाला याला प्रेक्षकांच्या विशेष नजरेत आला. आता अर्जन ‘ऑपरेशन टेरर : ब्लॅक टॉर्नेडो’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ही वेबसीरिज मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे.

लेखक संदीप उन्निथन यांच्या ‘ब्लॅक टॉरॅनो : द थ्री सीग्स ऑफ मुंबई २६/११’ या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारित आहे. निर्मिती अभिमन्यू सिंग यांनी केली आहे. मॅथ्यू ल्युटवेलर यांनी वेबसीरिजच्या सहनिर्मात्यासह दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या वेबसीरिजमध्ये अर्जनसोबत अभिनेता अर्जुन बिजलानी, मुकुल देव, विवेक दहिया, सिड मक्कर, विक्रम गायकवाड आणि अविनाश वाधवन, अभिनेत्री तारा अलिशा बेरी हे कलाकार झळकणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News