फ्री वायफाय वापरताय? तर तुमच्यावरही येऊ शकते पश्चाताप करण्याची वेळ..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
 • ठिकठिकणी "फ्री वायफाय" चे लागलेले बोर्ड आपण पहिले की, आपली पावले अचानक त्यावेळी त्याठिकाणी वळतात.
 • आजकाल तर मोठे मोठे शॉप्स, दुकाने हे गर्दी वाढविण्यासाठी मोफत वायफायची सुविधा देताना दिसतात.

आजचा जमाना इंटरनेटचा आहे. मोफत वायफाय मिळाले तर क्या बात है..! मात्र या मोफत वायफायमुळे किती फायदे आणि तोटे होऊ शकतात याची आपण कल्पना देखील केली नसेल. 

ठिकठिकणी "फ्री वायफाय" चे लागलेले बोर्ड आपण पहिले की, आपली पावले अचानक त्यावेळी त्याठिकाणी वळतात. आजकाल तर मोठे मोठे शॉप्स, दुकाने हे गर्दी वाढविण्यासाठी मोफत वायफायची सुविधा देताना दिसतात. मात्र हे फार धोकायदाय ठरू शकत. 
 

 • मोफत वायफायठिकाणी दोन पद्धतीने वायफाय आपल्या फोन किंवा लॅपटॉपशी कनेक्ट होताना दिसतो. पाहिलं म्हणजे कोणत्याही सांकेतिक शब्दांशिवाय किंवा पासवर्डशिवाय आपण नेटला कनेक्ट होऊ शकतो. 
   
 • तर दुसरी पद्धत म्हणजे, नेट्वर्कशी कनेक्ट होण्याकरिता पासवर्ड किंवा सांकेतिक मेसेज टाईप करणे आवश्यक असते. त्यानंतरच तुम्ही लॉगिन करू शकता. 
   
 • त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय वापरताना काळजी घेणं आवश्यक ठरत. 
   
 • मोफत वायफाय वापरताना तुमचा वैयक्तिक बँक खाते, संवेदनशील डेटा ओपन करू नका. यामध्ये हॅक होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.  
   
 • तुमचा मोबाईल ऑटोमेटिकली सार्वजनिक वायफायला कनेक्ट होणार नाही, याची काळजी घ्या. 
   
 • सार्वजनिक नेटवर्कवर ब्राऊझर करण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरणे. व्हीपीएनमुळे सर्व सुविधा एका सुरक्षित नेटवर्कमधून पुरविल्या जातात. 
   
 • तुमच्या मोबाईलवर  टू फॅक्टर ऑथेंटीकेशन वापरा. यामुळे फ्री वायफाय वापरताना कुणीही तुमच्या अंतर्गत डेटासोबत लॉगिन करू शकत नाही. आज बऱ्याच सेवांमध्ये आणि वेबसाइटमध्ये हे टू फॅक्टर ऑथेंटीकेशन वापरले जाते. 
   
 • मोफत वायफाय मिळविण्याच्या उत्साहात अनेकजण नेटवर्कच नाव नीट पाहत नाही. बनावट नेटवर्कद्वारे नावाचा वापर करून अनेकदा हॅकर्स या गोष्टीचा फायदा उचलतात. त्यामुळे तुम्हाला खात्री नसेल तर नेट्वर्कसंबंधी माहिती जाणून घेऊनच नेटवर्कला कनेक्ट व्हा.
   
 • आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्रत्येक अप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड असणे आवश्यक आहे. 
   
 • फ्री वायफाय वापरताना सर्वात मोठा धोका असतो तो व्हायरसचा..! मोफत वायफाय वापरताना आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलला चांगल्या कंपनीचा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News