तूम्ही मला मत देणार आहात की, तुमच्या मुली?; महेश बालदींचं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 October 2019
  • भाजपशी गद्दारी करणा-या महेश बालदींची जीभ घसरली
  • महेश बालदींच्या वक्तव्यावर उरणकर संतापले  

मुंबई: उरणमधील शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून याही निवडणुकीत ते शिवसेना- भाजप- रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. मात्र तेथील स्थानिक नेते महेश बालदी यांची बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, तरी देखील ते अपक्ष म्हणून निवडणुक लढवणार आहेत. बंडखोरी केल्यानंतर बालदी आपल्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. प्रचार करत असताना पक्षाच्या नावाचा वापर देखील त्यांच्या कडून वारंवार होत आहे. अशाच एका सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. तुम्ही मला मत देणार आहात की, तुमची मुलगी? असे संतापजनक वक्तव्य उरण येथील भाजपचे बंडखोर आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन उरणमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उरणमधील एका कॉ़र्नरसभेत बोलताना बालदी यांची जीभ घसरली असून त्यांनी चक्क उरणवासीयांच्या मुलींवर वक्तव्य केले. प्रचारात विरोधीपक्षनेते मी असा आहे...तसा आहे..म्हणत माजी जात काढली जात आहे. आता मला सांगा तुम्हा मत देणार आहात की, तुमच्या मुली देणार आहात अशी उर्मट मुक्ताफळे त्यांनी उधळली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून उरणमधील घराघरांतून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. महेश बालदी निवडणूक लढवत आहेत, ठिक आहे. पण त्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी असून, आमच्या मुलींना असे प्रचारात ओढायला नको पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांतून उमटली आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News