"ऑन द स्पॉट" जॉब मिळालेल्या तरुणांना नियुक्ती पत्र

दिनेश गोगी
Sunday, 22 September 2019
  • उल्हासनगरातील बारमाही ऑन द स्पॉट जॉब उपक्रमाला युवासेना सचिव सरदेसाई यांची शाबासकी

उल्हासनगर: मागच्या महिन्यापासून शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरात बेरोजगार तरूणांसाठी "ऑन द स्पॉट जॉब" हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आज या उपक्रमाला युवासेना प्रदेश सचिव वरूण सरदेसाई यांनी भेट देऊन शाबासकी दिली असून त्यांच्या हस्ते जॉब मिळालेल्या तरूणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 

उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोर व चांदीबाई कॉलेज जवळ असणाऱ्या अयोध्या नगर शिवसेना शाखेत शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, शाखाप्रमुख सुनील (कलवा) सिंग यांच्या पुढाकाराने 23 ऑगस्ट पासून बारमाही ऑन द स्पॉट जॉब हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवण्यात येत आहे. आजपर्यंत तिनशेच्या वर बेरोजगार तरुणांना जॉब मिळाले असून त्यांची जॉब साठीची भटकंती थांबली आहे. 

या उपक्रमाने प्रभावित झालेले सरदेसाई यांनी अयोध्या नगर शाखेत भेट देऊन चौधरी, श्रीखंडे यांना शाबासकीची थाप दिली. तसेच त्यांनी जॉब मिळालेल्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, पदाधिकारी राजेश कणसे, सुनील(कलवा) सिंग, सागर पगारे, ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव, जावेद शेख, गणेश माळवे, रुपेश मोहिते, दिनेश यमगर,  हरीश खेत्रे उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News