डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया सुरू; ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत या तारखेपर्यंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

तंत्रशिक्षण संचालनालयाने इयत्ता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे.

अकोलाः तंत्रशिक्षण संचालनालयाने इयत्ता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीतील प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी एक जुलै रोजी जाहीर होईल.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ही प्रवेश प्रक्रिया एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जासाठी खुल्या गटातील विद्यार्थी, परराज्यातील विद्यार्थी यांना ४०० रुपये शुल्क असेल तर राज्यातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क आहे. प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना https://poly19.dtemaharashtra.org/diploma19/ या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे. 

असे आहे वेळापत्रक 
- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत: १८ जूनपर्यंत 
- तात्पुरती गुणवत्ता यादी: १९ जून 
- गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविण्याचा कालावधी: २०      आणि २१ जून 
- ‘कॅप’ची पहिली फेरी: २४ जूनपासून 
- कॉलेजांचे पर्याय भरण्यासाठी मुदत: २५ ते २८ जून 
- ‘कॅप’च्या पहिल्या फेरीची कॉलेज अॅलॉटमेंट यादी: १     जुलै   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News