शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच संस्कृतीपण जपा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

अकोला : मराठा सेवा मंडळ अकोलाद्वारा आयोजित समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, ७ जुलै रोजी पत्रकार भवन अकोला येथे संपन्न झाला.

सर्व प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

अकोला : मराठा सेवा मंडळ अकोलाद्वारा आयोजित समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, ७ जुलै रोजी पत्रकार भवन अकोला येथे संपन्न झाला.

सर्व प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे होते. व्यासपीठावर आमंत्रित पाहुणे राजेंद्र गायकवाड, पंडित चौधरी, किरण नाईकनवरे, तानाजी नेमाने, निलेश खेडकर, सौ. शोभाताई गरड, मनोज चव्हाण, सुबोध वाकडे, मारोती भगत, दत्तात्रय खताळ, विष्णुपंत काशीद, यांचा समावेश होता. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना नगर सचिव बिडवे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच आपल्या समाजातील संस्कृती व गुणवत्ता सुध्दा जपाव, वाईट गुणांचे अनुकरण केल्यापेक्षा जीवनात चांगल्या गुणांचे अनुकरण करावे, त्यामुळे तुमच्या जीवनातील गुणवत्तेची टक्केवारी ही कितीतरी पट टक्क्यांनी वाढेल असे म्हटले.

समाजातील गुणवंत विद्यार्थी वर्ग बारावी प्रथम पुरस्कार पूनम साबळे, द्वितीय शंतनू गायकवाड तर तृतीय साक्षी पाटणकर यांना देण्यात आले तर दहावीमधील प्रथम पुरस्कार ईशा निकम, द्वितीय गौर मोहिते, वैष्णवी पवार तृतीय भूमिका पवार यांना देण्यात आले. उर्वरीत ५० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम मराठा सेवा मंडळ मागील ४० वर्षांपासून आयोजित करीत आहे. कार्यक्रमाला समाजबांधव व महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष उमेश सटवाले, उपाध्यक्ष मुरलीधर सटाले तर कार्यकर्त्यांमध्ये गजानन देव, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण जाधव, प्रदिप लुगडे, अमोल भोसले, राजु भगत, राजेश अंधारे, ऋषीकेश सटाले, राजेश सटाले, गणेश गिराम, नंदू मांडवे, सचिन पवार, अनिल मोटे, सुनील गव्हाणे, प्रमोद वाकडे, राजेंद्र कावळे, सुरेश गायकवाड, अंकित सटाले यांनी  परिश्रम घेतले. संचालन मुरलीधर सटाले तर आभार प्रदर्शन उमेश सटवाले यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News