भारतीय सैन्य युद्धाव्यतिरिक्त देखील करतात "ही" काम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
 • शाचे शत्रूंपासून रक्षण करणे हे त्यांचे मूळ काम जरी असले, तरी समाजासाठी देखील अनेक महत्वाची कामे ते करत असतात.
 • ते देखील कोणतीही अपेक्षा न बाळगता. तर जाणून घेऊयात अशी कोणती कामे आहेत.. 

भारतीय सैन्य हा भारताचा जीव आहे. देश ताठ मानेने रहावा यासाठी नेहमी सीमेवर झटणारे सैनिक आपली रक्षा करण्यासाठी स्वतःच्या जिवाचीही पर्वा करत नाही. मात्र आपले सैन्य हे देशासाठी लढण्याव्यतिरिक्त अनेक कामे करतात. अशी कामे जी लोकांसाठी उपयोगी आहेत. देशाचे शत्रूंपासून रक्षण करणे हे त्यांचे मूळ काम जरी असले, तरी समाजासाठी देखील अनेक महत्वाची कामे ते करत असतात. ते देखील कोणतीही अपेक्षा न बाळगता. तर जाणून घेऊयात अशी कोणती कामे आहेत.. 

भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये लढत असल्याचं माहित आहे आपल्याला.. मात्र त्या ठिकाणी लोकांसाठी अनेक लोकोपयोगी कामे असलेली कामे करतात. काश्मिरी जनतेने मुख्य प्रवाहात यावे यासाठी आपले सैन्य नेहमी झटत असते. यासाठी एक ऑपरेशन सैन्याकडून राबवले जात आहे. “ऑपरेशन सद्भावना” असं त्याच नाव असून  याद्वारे काश्मिरी जनतेशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत आहे. 

 • या ऑपरेशनसाठी दरवर्षी ४५० कोटींचा खर्च करण्यात येतो.
 • शाळांची उभारणी करणे
 • स्त्री सबलीकरण केंद्र उभारणे
 • महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणे
 • नव्या गावांची निर्मिती करणे
 • राष्ट्रीय एकात्मता जगविण्यासाठी शैक्षणिक आणि प्रेरणादायी सहलींचे आयोजन करणे
 • आरोग्य संदर्भातील मेडिकल कॅम्पचे आयोजन करून माफक दारात सुविधा मिळवून देणे
 • विविध फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू प्राण्यांना मदत करणे
 • विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे

अशा विविध कामांचा भर देखील भारतीय सैन्याकडे असतो. याशिवाय कुठे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असता, भारतीय सैन्याला बोलवले जाते. त्यामुळे आपली भारतीय सेना खरंच महान असल्याचं समोर आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News