कला येणे-शिकवणे-सादर करणे हे कौशल्य ज्या माणसाकडे आहे, तो खरा कलाकार...

सुरज पाटील
Tuesday, 24 September 2019

सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे माणसाच्या अंगी असलेल्या कलेला वाव देणं आणि माझ्या मते वटंवार सरांनी आपल्या नातीमध्ये हेच घेरलंय.

ही आहे नांदेडची #श्रृती_वटंवार. नांदेड दौऱ्यावर असताना आमचे संपादक #संदीप_काळे यांचे गुरू #राजाराम_वटंवार यांना भेटण्याची संधी मिळाली. अनेक संस्कारित विद्यार्थी घडण्यामागे यांचा हात आहे, अशाच विद्यार्थ्यांना घडवता-घडवता आपल्या नातीलाही त्यांनी ती हक्काची जागा देऊ केली.

आपली नात श्रृती वटंवार हीच्या अंगी असलेली कला त्यांनी ओळखली आणि तिच्या कलेनुसार डान्सच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे माणसाच्या अंगी असलेल्या कलेला वाव देणं आणि माझ्या मते वटंवार सरांनी आपल्या नातीमध्ये हेच घेरलंय.

श्रृती उत्तम डान्स करते, त्याचं उदाहरण म्हणजे तीने आमच्यासमोर न लाजता केलेले सादरिकरण. मी हीच्या कलेचा फॅन झालोच; पण तिने ज्या प्रकारे एका सांगण्यात आपलं जे सादरिकरण केलं आहे, त्यानुसार माझ्यासोबतच तिचा डान्स पाहाणारे सगळेच फॅन्स असतील, यात शंकाच नाही...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News