तक्रार कोणाचीही असो आठवडाभरात सोडवा : इराणी

सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Tuesday, 25 June 2019
  • अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवू नयेत
  • इराणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला​

अमेठी : लोकसभा निवडणुकीत अनुकूल जनादेश मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या ॲक्‍शन मोडमध्ये गेल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीने तक्रार केल्यानंतर आठवडाभराच्या अवधीत तिचा निपटारा केला जावा, या पातळीवर अपयशी ठरल्यास खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवू नयेत, कल्याणकारी योजनांचे लाभ गरजू लोकांपर्यंत पोचायला हवेत. एका आठवड्याच्या आत लोकांच्या समस्या सोडविल्या जायला हव्यात, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत समस्या घेऊन येत असेल, तर सर्वकाही आलबेल नाही, हेच दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इराणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतरचा इराणी यांचा हा दुसरा अमेठी दौरा होता. याआधीही त्यांनी अमेठीला भेट देत विविध विकासकामांचा आढावा घेतला होता. तसेच राजकीय हिंसाचारामध्ये मरण पावलेल्या सुरेंद्रसिंह यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले होते. अमेठीमध्ये सध्या भटक्‍या जनावरांनी उच्छाद मांडला असून, यावर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना इराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News