..आणि अखेर एंटोनी ग्रीजमैनचा बार्सिलोनामध्ये प्रवेश ! 

जयेश सावंत (यिनबझ)
Saturday, 13 July 2019

अख्या फुटबॉल जगताचे लक्ष लागून राहिल्येल्या फ्रान्सचा विश्वचषक विजेता स्टार फुटबॉलपटू एंटोनी ग्रीजमैनने आपल्या पुढील फुटबॉल कारकिर्दीचा प्रवेश स्पेनमध्येच फुटबॉल क्लब बार्सिलोनामध्ये निश्चित केला आहे. याआधी ग्रीजमैन ऍथलेटिको माद्रिद संघाकडून स्पॅनिश फुटबॉल साखळीत खेळत होता.

बार्सिलोनाने एंटोनी ग्रीजमैनला तब्बल १२० दशलक्ष डॉलर्स मध्ये करारबद्ध केले आहे. ज्यामुळे तो फुटबॉल जगतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याआधी मागील वर्षीसुद्धा तो बार्सिलोनासोबत करारासाठी कटिबद्ध होणार होता, परंतु फ्रान्सच्या विश्वचषक विजेतेपदानंतर त्याने आपला विचार बदलून ऍथलेटिकोसोबत नव्याने करार केला ज्यामुळे त्याची फुटबॉल जगतातील किंमत वाढली. यावर्षी त्याने ऍथलेटिकोला सोडचिट्टी देण्याचे संकेत दिले होते ज्यामुळे त्याची किंमत घसरली, आणि ऍथलेटिकोला त्याला बार्सिलोनाला विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता.  

२८ वर्षाचा ग्रीजमैन फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी सर्वात जास्त गोल करण्याऱ्या खेळाडूंमध्ये (२९) आठव्या क्रमांकावर आहे. आणि माद्रिदमध्ये खेळताना त्याने ९४ गोल केले आहेत. आता बार्सिलोनाचे स्टार्स लिओनेल मेस्सी, लुईझ सुआरेझ, पिके यासोबत ग्रीजमैन कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल !

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News