साराच्या वाट्याला आणखी एक चित्रपट?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019
  • दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटासाठी साराचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे.
  • या चित्रपटात अभिनेता धनुष आणि हृतिक रोशनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मुंबई : सध्या सारा ‘लव आजकल २’ चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या शिवाय ‘कुली नं. १’ चित्रपटही तिने साईन केलाय. तिच्या हाती दोन बिग बजेट चित्रपट असताना आणखी एका हिंदी चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटासाठी साराचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे.

या चित्रपटात अभिनेता धनुष आणि हृतिक रोशनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्यातरी चित्रपटाची कथा आणि इतर स्टारकास्टबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटानंतर सारा लंबी रेस खेळणार असल्याचे सगळ्यांनीच म्हटले. ते तिने ‘सिम्बा’ चित्रपटामधून सिद्धही केले. या चित्रपटात धुनष-हृतिकबरोबर काम करायला मिळणे म्हणजे भाग्यच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News