"बामू"च्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागाचे मतदान 31 ऑगस्टला तर, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे मतदान 23 सप्टेंबरला होणार आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील 427 महाविद्यालयात या निवडणुका होणार आहेत. 

महाविद्यालय निवडणुकीची अधिसूचना 16 ऑगस्टला तर, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना 6 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी 2019- 20 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा पुर्णवेळ अभ्यासक्रमाला 16 ऑगस्टपर्यंत प्रवेश झालेला असणे आवश्‍यक आहे. अधिसूचनेनंतर निवडणूक कार्यालयात अर्ज विक्रीसाठी उपलब्ध होतील. 

महाविद्यालय, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी तुकडीनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 19 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे. मतदार यादीवर 20 ऑगस्टला तीन वाजेपर्यंत आक्षेप घेता येईल. आक्षेपानंतर त्याच दिवशी पाच वाजता अंतिम मतदार यादी सूचनाफलक, संकेतस्थळावर जाहीर होईल. 22 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, अर्जाची छाननी 24 ऑगस्टला. अर्जाबाबत आक्षेप 26 ऑगस्टला 11 ते 5 वाजेपर्यंत घेता येईल. 27 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेनंतर नामनिर्देशन अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 28 ऑगस्ट दुपारी 4 वाजेपर्यंत मुदत आहे. 

उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर प्रसिद्ध होईल. 31 ऑगस्टला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान मतदान होणार असून तीन वाजेनंतर मतमोजणी करुन निकाल घोषित केला जाईल. तसेच निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्ग, प्रतिनिधी आणि एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक यातून प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची माहिती विहीत नमुन्यात विद्यापीठाला ई-मेल आणि हार्डकॉपी 3 सप्टेंबरपूर्वी विद्यापीठात सादर करायवयाच्या आहेत. उमेदवाराने खर्चाचा हिशोब 4 ते 18 सप्टेंबरपर्यंत सादर करायचा आहे. 

विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक 
निवडणुकीची अधिसूचना आणि मतदार 6 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. यादीवरील आक्षेप 9 सप्टेंबरला. आक्षेपावर निर्णय आणि अंतिम यादी 11 सप्टेंबरला तर, 12 सप्टेंबरला अर्ज दाखल करता येईल. छाननी आणि नामनिर्देशन अर्जाची यादी 13 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. उमेदवारांना 14 सप्टेंबरल आक्षेप घेता येईल. 16 ऑगस्टला आक्षेपावर निर्णय देऊन यादी प्रसिद्ध होईल. अर्ज माघार घेण्यासाठी 18 सप्टेंबरला चार वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. मतदान 23 सप्टेंबरला तर मतमोजणी आणि निकाल 26 सप्टेंबरला लागणार आहे. एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक सदस्यांचे नामनिर्देशन 28 सप्टेंबरला करावयाचे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News