अण्णाभाऊ 

माधव जाधव
Wednesday, 31 July 2019

तेंव्हा तुला अन्
तुझ्या अक्षरशिल्पांना
 कोटी कोटी सलाम 
कोटी कोटी सलाम 

निवडुंगातील काटेरी झाडाझुडपांना
प्रकाशमान करण्यासाठी
 वालुकामय प्रदेशातून
अंधाराला चिरत
अनंत सूर्याची मोट बांधून आलास
हातात क्रांतिकारी प्रकाशलेखणी घेऊन 

तुझे वास्तवाचे अन्तःचक्षु 
म्हणजे जगातील एक महान आश्चर्यच होतं
तू घामांच्या वेदनेची शाई भरून  
अक्षर लेणी कोरलंस
पाषाणी -हदयाचा संस्कृतीवर
 अन्
पिचलेल्या पिचकावलेल्या 
दबलेल्या दाबलेल्या
 माणसांना अमर केलंस
श्रमूल्याचा सिद्धांत मांडून 
तेंव्हा तुझ्या पुढे
सगळे जग नतमस्तक झाले 
अन्
तुझ्या एका शब्दा खातर
कष्टकरणारी हातं
पृथ्वीला समृद्ध करण्यासाठी
 सक्षम आहेत
हे जगानी निमुटपणे मान्य केलं
अन् 
माणसाच्या कवडीमोल घामाला
मौल्यवान केलस 
पाचू-माणिक, हि-या,मोत्या पेक्षाही 

म्हणूनच
घामाचे उत्सव सुरू झाले
सृष्टीच्या रोमारोमात आणि कणाकणात 
तेंव्हा कुठे
पाताळातील कपोलकल्पित 
शेषनागालाही लाज वाटली
पृथ्वीला मस्तकावर पेलण्याच्या
खोट्या बडेजावपणाची 
तू
मूलनिवासी माणसांचं
त्यांच्या शीलाचं,कुलाचं वैभव 
पुन्हा स्थापित करण्यासाठी
झिजलास खपलास
लेखणीला शस्त्र करून 
म्हणूनच तू झालास
सम्राटाचाही सम्राट, साहित्य सम्राट 
अन्
मरणातून जीवनाकडे
तू झेपावलास
एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखा 

तेंव्हा तुला अन्
तुझ्या अक्षरशिल्पांना
 कोटी कोटी सलाम 
कोटी कोटी सलाम 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News