अनिशाचे वेबविश्‍वात पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

आता अनिशा बट लवकरच वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या तिच्या हाती दोन वेबसीरिज आहेत

 

अनिशा बट गेली बरीच वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत आहे. आतापर्यंत तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’, ‘ये जवानी है दिवानी’ अशा बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली. ती मूळची लंडनची असल्याने तेथे तिने काही स्टेज शोज्‌ केले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत ती आली. आता ती लवकरच वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सध्या तिच्या हाती दोन वेबसीरिज आहेत. त्यातील एक वेबसीरिज म्हणजे ‘हवा बदले हासू’. ही वेबसीरिज सोनी लिव्ह ॲपवर पाहायला मिळणार आहे. यामध्ये अनिशा ब्रिटिश तरुणीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती अल्ट बालाजीच्या एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज नानावटी खून खटल्यावर आधारित आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News