संतप्त विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’मध्ये गोंधळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्राचार्यांची खुर्ची कार्यालयातून बाहेर काढून आयटीआयच्या इमारतीबाहेर फेकली.

शेगाव - येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रशासनाकडून प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई केल्या जात असल्याचे कारणावरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्राचार्यांची खुर्ची कार्यालयातून बाहेर काढून आयटीआयच्या इमारतीबाहेर फेकली. ही घटना आज (ता.१३) दुपारी ११.३० वाजता सुमारास घडली.

सध्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेले प्रवेश अर्ज त्यांना औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन जमा करावे लागतात. तेथे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सबमिशन प्रक्रिया केली जाते. ज्याची पावती विद्यार्थ्यांना मिळते. त्याअनुषंगाने (ता. १२) सकाळी १० वाजतापासून असंख्य विद्यार्थी येथील औद्योगिक संस्थेत उपस्थित झाले होते. मात्र सकाळी १० वाजतापासून दुपारपर्यंत एकाही विद्यार्थ्यांचा अर्ज घेण्यात आला नव्हता आणि शेवटी दुपारी ४  वाजेपर्यंत आयटीआय प्रशासनाकडून असे सांगण्यात आले की, इंटरनेट बंद असल्यामुळे आज अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत.

विद्यार्थ्यांनी खामगाव येथे जावून अर्ज जमा करावेत. परिणामी सकाळपासून रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत निषेध नोंदविला. त्यानंतर आज सकाळी १० वाजता पुन्हा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेकरिता आयटीआयमध्ये आले असता आजही नेट बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे ऐकल्यानंतर अर्ज जमा करण्याकरिता आलेले विद्यार्थी संतप्त झाले व जाब विचारण्याकरिता प्राचार्या राजश्री पाटील यांच्या कार्यालयात पोहचले. मात्र, प्राचार्या राजश्री पाटील ह्या दररोज जळगांव (खा) येथून ये-जा करीत असल्यामुळे त्या दुपारी १ वाजल्यानंतरच येतात असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. काहींनी प्राचार्यांना याबाबत बोलण्यासाठी संपर्क क्रमांक मागितला असता संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांक दिला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणखी संतप्त झाले.

 त्यांनी प्राचार्या राजश्री पाटील यांच्या कार्यालयातील खूर्ची उचलून संस्थेच्या इमारतीबाहेर फेकली. घटनेनंतर विद्यार्थी संस्थेच्या आवारातून निघून गेले. तर जातांना संस्थेच्या सेक्युरिटी गार्डने त्या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद केली असून, सदरहु विद्यार्थी हा सिध्दनाथ केंगारकर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील माध्यमांचे प्रतिनिधी आयटीआयमध्ये गेले असता प्राचार्या राजश्री पाटील या दुपारी २.१५ वाजेपर्यंत ड्युटीवर पोहचल्या नव्हत्या. तसेच घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांना मोबाईद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. डिजीटल इंडियाच्या युगात नेट बंद असल्याचे कारण संयुक्तीक वाटले नाही. आयटीआय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची छळवणूक केल्या जात असल्याचे डोक्यात गेल्याने प्रवेश प्रक्रियेत दिरंगाईस जबाबदार प्राचार्या राजश्री पाटील यांची खुर्ची इमारतीबाहेर फेकली. अशी प्रतिक्रीया रणसंग्राम नावाच्या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दनाथ केंगारकर यांनी दिली आहे. केंगारकर हे स्वत: दहावी पास झाले असून, आयटीआय प्रवेशासाठी अर्ज भरण्याकरिता कालपासून आयटीआयमध्ये चकरा मारीत होते. 

आंदोलनाचा धसका घेत, अर्ज घेण्यास सुरूवात
नेट बंद असल्यामुळे (ता. १२) एकाही विद्यार्थ्याचा अर्ज घेतला गेला नाही. तसेच आज १३ जून रोजी सकाळी पुन्हा नेट बंद असल्याचे आयटीआय प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची खुर्ची बाहेर फेकण्याचा प्रकार घडला. मात्र, या आंदोलनात्मक क्रियेनंतर आयटीआयमधील नेट सुरू होऊन 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News