अँकरिंगचे खुणावणारे क्षेत्र...!

डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
Saturday, 29 June 2019

कोणतीही पदवी घेत असताना चार गोष्टींच्या (खरे तर चार शब्दांच्या) प्रेमात पडणे हा अगदी स्वाभाविक रस्ता असू शकतो.

कोणतीही पदवी घेत असताना चार गोष्टींच्या (खरे तर चार शब्दांच्या) प्रेमात पडणे हा अगदी स्वाभाविक रस्ता असू शकतो. थोडक्‍यात, सांगायचे तर एखाद्याचे बोलणे ऐकून सहज कोणीतरी म्हणतो ‘काय मस्त बोलतोयस रे, ‘आरजे’ शोभतोस! ‘डीजे’च्या धिंगाणा घालणाऱ्या संगीतावर तर अनेकांचे अनेक वेळा थिरकून झालेले असते. त्यात खिसा गरम असलेले मोजके नशीबवान डिस्कोथेक, पबमध्येसुद्धा त्याची मज्जा अनुभवून आलेले असतात. गणपती, नवरात्र, लग्न, विविध सार्वजनिक कार्यक्रमातून डीजेची मागणी ऐकून, त्यांना मिळणारे पैसे ऐकून या साऱ्याबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण होत असते.

कॉलेजातील विविध कार्यक्रमांसाठीचे अँकरिंग करणारा तर फॉर्मातच असतो म्हणा ना! प्रमुख पाहुणे ते प्राचार्य यांच्या जोडीला स्टेजवर उभे राहणे म्हणजे काय? मग त्याच गोष्टी डोक्‍यात घोळू लागतात. त्याला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती सध्या कायमच वाचायला मिळतात. ‘आठ दिवसात बना...’ वगैरे वगैरे!

काय मस्त दिसतेयस तू आज? असे ड्रेस फक्त तुलाच कॅरी करता येतात हं! काय फिगर आहे? किंवा काय कडक लुक देतोय तो पाहा! क्‍या चाल है? काय कूल दिसतो तो कोणत्याही आउटफिंटमध्ये नाही? असे ऐकल्यावर मॉडेलिंगचा किडा चावणे तर सोडाच; पण सारखाच डसू लागतो.

या चारात करिअर आहे का? होय नक्की आहे. पण त्यासाठीचा रस्ता अभ्यासातून सुरू होतो, खडतर असतो. अवांतर पण नेमके वाचन, मातृभाषेवर पक्की पकड गरजेची. डीजे बनायचे असल्यास संगीताचा कान हवा. त्याच वेळी समोरच्या गर्दीला काय हवे त्याची जाण हवी. निव्वळ ‘आवाज वाढव डीजे तुला आयची शप्पथ’ हे गाणे पाठ असून काहीच उपयोग नाही. मुख्य म्हणजे डीजेची मागणी फारतर पन्नास दिवसांची असते, हेही समजायला हवे. मॉडेलिंगमध्ये करिअर आहे; पण ती एक तर उंच सुळका चढण्याची किंवा निसरड्या पायवाटेवरच्या चालीची असते. सुळका चढण्यासाठी कौशल्य लागते नाहीतर पायवाटेवरून पाय घसरून पडायला होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News