जगातील सर्वोच्च शिखरांवर भारताचा झेंडा फडकवणारे आनंद बनसोडे 

जयपाल गायकवाड (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Saturday, 6 April 2019

तरुणाईचे आयडॉल 

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याने युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (17 जुलै 2014), आफ्रिकेतील किलोमांजरो (15 ऑगस्ट 2014) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (3 नाव्हेंबर 2014). या प्रत्येक ठिकाणी, त्याने भारताचा झेंडा फडकावला तो खऱ्या अर्थाने तरुणांचा आयडॉल आहे. आनंद बनसोडे यांची "सकाळ माध्यम समूहा'च्या 'यिनबझ'शी 'तरुणाईचे आयडॉल' या युवकांना प्रोत्साहित करणाऱ्या खास विषयावर झालेली बातचीत... 

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याने युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (17 जुलै 2014), आफ्रिकेतील किलोमांजरो (15 ऑगस्ट 2014) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (3 नाव्हेंबर 2014). या प्रत्येक ठिकाणी, त्याने भारताचा झेंडा फडकावला तो खऱ्या अर्थाने तरुणांचा आयडॉल आहे. आनंद बनसोडे यांची 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'यिनबझ'शी 'तरुणाईचे आयडॉल' या युवकांना प्रोत्साहित करणाऱ्या खास विषयावर झालेली बातचीत... 

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी आपल्या संघर्षाबद्दल सांगताना म्हणाले, मी सोलापुरातील गुजराथी मित्रमंडळाच्या मागे पत्र्याच्या झोपडीत राहत असे. आता कुमठा नाका येथे राहतो. माझा जन्म तीन बहिणींनंतर झाला. वडील अशोक बनसोडे हे रिक्षा चालवत आणि त्यांचे टायर पंक्चरचे दुकानही होते. वडील घरातील खर्च कसाबसा चालवण्याइतपत कमावायचे. आई गृहिणी. शिक्षणात माझी फारशी प्रगती नव्हती. ‘एकदा पास तर तीनदा नापास’ असे नेहमी व्हायचे.

मी शाळेतील ‘ढ’ विद्यार्थी असल्याने त्याला जास्त मित्र नव्हते. त्यावरून शाळेत मला चिडवले जाई. त्यामुळे एकलकोंडाही झालो होतो. अभ्यासाव्यतिरिक्तची पुस्तके वाचण्यात मात्र गोडी होती. वाचनात ‘अरेबियन नाइट्स’, ‘सिंदबादच्या सात सफरी’ अशी पुस्तके आल्याने माझ्या बालमनावर परिणाम झाला. जगभर भटकावे, काहीतरी साहस करावे अशी स्वप्ने पाहू लागलो. कागदावर साहसी स्वप्ने रंगवत असे!  एकदा माझ्या वाचनात आले, की ‘माउंट एव्हरेस्ट ‘ हे जगातील सर्वोच्च शिखर आहे व ते भारताच्या उत्तर सीमेलगत आहे. मी ते शिखर चढण्याच्या कल्पना सुचू लागलो. हे ऐकून लोक माझी टर उडवायचे, मात्र माझ्या मनात माउंट एव्हरेस्टने ठाण मांडले होते.  मी नववीत नापास झालो आणि वडिलांनी स्वतःसोबत गॅरेजवर काम करण्यास नेले. वडील माझ्या  वाचनाच्या छंदामुळे बिनकामाचा म्हणत. मात्र आईने सर्वांचा विरोध पत्करून नववीमध्ये पुन्हा प्रवेश मिळवून दिला. 

पुढे रेल्वे खात्यातील नोकरीसाठी, परीक्षांसाठी अनेक राज्यांत फिरणे झाले. माझ्या वाचनात प्र.के. घाणेकरांचे ‘एव्हरेस्ट – राजा हिमशिखरांचा’ हे पुस्तक आले. माझ्या एव्हरेस्ट चढण्याच्या स्वप्नाला तरारून कोंब फुटू लागला. मग मी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण कसे व कोठे मिळेल या माहितीसाठी बराच पाठपुरावा केला. पण त्‍या क्षेत्रातले माहितगार सोलापुरात गवसले नाहीत. मग पुण्यात अशा व्‍यक्‍तींची शोधमोहीमच हाती घेतली. तेव्हा माझी भेट पुण्यातील गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्याशी झाली. त्‍यांना पाहताच तोंडून आपोआप “सर, मला माउंट एव्हरेस्ट सर करायचे आहे.” हे वाक्य निघून गेले. सुरेंद्र शेळके हे पुण्यातील गिर्यारोहक .त्यांनी माझी धडपड प्रथमदर्शनी ओळखली. एव्हरेस्टसंबंधीची माहिती मिळवण्‍याच्‍या ओघात ‘हिमालयीन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’चा पत्ता मिळवला. 

शेळके सरांनी दिलेल्या माहितीनुसार उत्‍तर काशीतील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग’मध्ये पोचलो. तेथे गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स पूर्ण केला. त्‍या कोर्ससाठी लागणारे पाच हजार रुपये बहिणीने वडिलांना न सांगता, स्‍वतःचे दागिने गहाण ठेवून दिले होते. मात्र त्या कोर्सनंतर घरातून विरोध सुरू झाला. ‘हे धोकादायक काम करून काही मिळत नाही. इथून पुढे असे उद्योग बंद’ कर म्हणून घरातून ठणकावून सांगण्यात आले. मी घरातून निघून गेल्‍यानंतर 2008 मध्‍ये गिर्यारोहणाचे दोन कोर्स पूर्ण केले. कुटुंबियांनी आशा सोडून दिली होती.

२०१० मध्ये एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न करणे शक्य झाले नाही. त्यानंतर एकाहत्तर टक्‍के गुणांनी बी.एससी. परीक्षा पास केली. पुढे पुणे विद्यापीठामधून एम.एससी. करत असताना एका शिखरावर उभा राहून तिरंगा फडकावत असतानाचे स्वप्न पडले आणि पुन्हा गिर्यारोहण संस्थेत कोर्स करण्यास गेलो. तेही घरच्यांशी खोटे बोलूनच!

अखेर, ४ ऑगस्ट २०१० या दिवशी समुद्रसपाटीपासून १९,७७७ फूट उंच असलेल्या T-2 या शिखरावर मी आणि सोबतच्‍या शेर्पांनी तिरंगा फडकावला. त्‍या शिखरावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरलो. त्याच क्षणी सोबत शिखरावर आलेल्या शेर्पा रुद्रने म्हटले, “तुम्हारे विश्वास ने यह कर दिखाया”.

त्यानंतर अमेरिकेत जाण्यासाठी पैशांची अडचण असतानाही मित्र आणि नातेवाईकांची मदत घेत पोहचलो आणि  १५ ऑगस्ट २०११ रोजी कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता हे शिखर चढला. त्या नंतर सहा महिने अमेरिकेतच राहिल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये भारतात परतलो.

अमेरिकेतून आल्यावर ‘मिशन एव्हरेस्ट २०१२’ बद्दल माहिती मिळाली. घरच्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला होता. त्यांनी  साथ देण्याचे ठरवले होते. या मोहिमेसाठी कमी पडत असलेली रक्कम राहते घर गहाण टाकून, कर्ज काढून उभी केली. आयुष्यात प्रथमच पक्के पाऊल पडले होते! एव्हरेस्ट मोहीम २३ मार्च २०१२ ला सुरू झाली. अनेक अडचणींचा सामना करत, अनेक अनुभव गाठीला बांधत एव्हरेस्ट काबिज करण्याच्या दिशेने मजल-दरमजल करत अखेर, १९ मे २०१२ रोजी सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी जगातील सर्वोच्च शिखरावर, माउंट एव्हरेस्ट वर पोचलो! 

एव्हरेस्ट सर केल्यानंतर २०१४ मध्ये युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (१७ जुलै २०१४), आफ्रिकेतील माऊंट किलोमांजरो (१५ ऑगस्ट २०१५) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (३ नोव्हेंबर २०१४) ही सर्वोच्च शिखरे सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा विक्रम केला. याची नोंद  लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांमध्ये झाली आहे. त्या रेकॉर्डसाठी विश्वविक्रमांच्या विद्यापिठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली आहे. 

कोण आहेत आनंद बनसोडे 

  • आनंद बनसोडे हे सोलापूर येथील आहेत त्यांनी हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा विक्रम केला आहे.
  • गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभवांवर आणि संघर्षावर आधारित ‘स्वप्नातून सत्याकडे’ हे लिहले आहे. युनायटेड नेशन्स सोबत काम करणारा चित्रपट अभिनेता फरहान खान याने आनंदच्‍या मे 2015 मधील अमेरिका मोहिमेचा फ्लॅगऑफ केला होता.
  • नुकताच आनंद बनसोडे व त्यांच्या पत्नी अक्षया यांना २०१९ या वर्षाचा “इंडियन बिजनेस आयकॉन अवार्ड” देण्यात आला.
  • “बेस्ट कपल इमर्जिंग बिजनेसमन” या कॅटॅगिरीमध्ये दोघांना हा पुरस्कार दिला गेला. त्यांच्या या संघर्षाला यिन बझचा सलाम

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News