AN-32 विमानातील सर्व १३ प्रवाशांचा मृत्यू; हवाई दलाचा दुजोरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

नवी दिल्ली: हवाई दलाची सर्च टीम गुरुवारी सकाळी AN-32 च्या क्रॅश साइटवर पोहोचली. AN-32 मधील सर्व १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने याला दुजोरा दिला असून याप्रकरणी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली: हवाई दलाची सर्च टीम गुरुवारी सकाळी AN-32 च्या क्रॅश साइटवर पोहोचली. AN-32 मधील सर्व १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने याला दुजोरा दिला असून याप्रकरणी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. 

आसाममधील जोरहाटमधून गेल्या सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले होते. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो होता. यासाठी नौदलाची एक तुकडी आणि इस्रोच्या उपग्रहाचीही मदत घेण्यात आली होती. अखेर मंगळवारी या विमानाचे काही अवशेष सापडले होते. विमानात ८ कर्मचाऱ्यांसह १३ प्रवासी होते.

विमानात होते हे लोक
जीएम चार्ल्स, एच विनोद, आर थापा, ए तंवर, एस मोहंती, एमके गर्ग, केके मिश्रा, अनूप कुमार, शेरिन, एसके सिंह, पंकज, पुताली आणि राजेश कुमार हे या विमानात होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News