अमायरा घेते तमीळची शिकवण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

प्रभुदेवा यांच्या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री अमायरा दस्तुर काम करताना दिसणार आहे.

अभिनेत्री अमायरा दस्तुरने फक्त हिंदीच नव्हे; तर दाक्षिणात्य चित्रपटांतही उत्तम कामगिरी केली. अगदी कमी वयात अमायराने चित्रपटसृष्टीमध्ये तिचं एक वेगळ स्थान निर्माण केलं. या वर्षी तर तिचे दोन हिंदी आणि एक तमीळ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

त्याशिवाय अमायरा सध्या तमीळ भाषेचे धडे गिरवत आहे. प्रभुदेवा यांच्या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात ती काम करताना दिसणार आहे. आपली भूमिका प्रेक्षकांना अधिक वास्तव वाटावी यासाठी ती मेहनत घेत आहे. याचबाबत अमायरा म्हणते, ‘माझ्या या चित्रपटातील भूमिकेसाठी मी स्वतःच डब करणार आहे. म्हणजेच माझी भूमिका प्रेक्षकांना अगदी आपलंसं करील.

तमीळ भाषा शिकण्याचा फायदा म्हणजे मी ही भाषा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते आणि चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही मला याचा उपयोग होईल.’ अमायरा सध्या घेत असलेली मेहनत तिच्या चित्रपटाला फायदेशीर ठरते का, हे येणारा काळच सांगू शकेल.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News