अमरावती विद्यापीठाने दिला ५० च्यावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयांत भोपळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए. बी.कॉम. अंतिम वर्षाचा उन्हाळी २०१९ परीक्षा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांच्या इंग्रजी या विषयाच्या पेपर मध्ये शून्य गुण विद्यापीठाद्वारे देण्यात आले असून खामगाव मध्ये ५० च्यावर विद्यार्थ्यांच्याना भोपळा मिळाला.

खामगाव - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए. बी.कॉम. अंतिम वर्षाचा उन्हाळी २०१९ परीक्षा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांच्या इंग्रजी या विषयाच्या पेपर मध्ये शून्य गुण विद्यापीठाद्वारे देण्यात आले असून खामगाव मध्ये ५० च्यावर विद्यार्थ्यांच्याना भोपळा मिळाला.

शैक्षणिक प्रक्रियेत गोंधळ विद्यापीठासाठी नवीन नाही. विद्यापीठाचे असे प्रकार सतत समोर येत आहे.  दरम्यान आता इंग्रजी विषयांत अनेकांना शून्य गुण मिळाले असल्याने विद्यापीठ चर्चेत आले. दरम्यान विविध संघटना आता या प्रकाराचा विरोध करत आहे. खामगांव तालुका एन.एस.यु.आय. तर्फे सुद्धा  या बाबत निवेदन गो.से. महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत तसेच ई-मेल द्वारे  विद्यापीठाला सादर केले आहे. यामध्ये बी.ए. बी.कॉम. अंतिम वर्षाच्या उन्हाळी २०१९ च्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात बहुतांश विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्या बाबत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.

अमरावती विभागामध्ये गेल्या काही वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे, परिणामी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही असे विद्यार्थी पुर्नामुल्यांकन अर्ज सदर करण्यास असमर्थ आहे. तरी विद्यापीठाने शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाचे पेपर पुन्हा तपासून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असेही  एन.एस.यु.आय. तर्फे विद्यापीठाला दिलेल्या निवेदनात नमूद आहे. यावेळी खामगांव तालुका एन.एस.यु.आय. अध्यक्ष साहिल देशमुख, उपाध्यक्ष समीर खान, आदित्य वाघमारे, सौरभ रीछारीया, तेजस महिवाल, नावेद शेख, अमोल पारसकर, अमर गावंडे, रोशन जाधव, शुभम मिरगे, विकी जाधव, दत्ता पानझाडे, सागर वाढोकर, पवन चव्हाण यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते हजर होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News