अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात घोळ

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

अमरावती  -  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने लोकसभा निवडणूक मतदानामुळे उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलविले. मात्र, असे करताना कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये घोळ केला. बी. कॉम तिसऱ्या व चौथ्या सेमिस्टरच्या विषयाचा पेपर एकाच दिवशी ठेवल्यामुळे  विद्यार्थी चांगलेच संभ्रमात आहेत.

एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. कुणीही मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर राहू नये, सर्वांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने  उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक बदलविले. वेळापत्रक बदलविताना बी. कॉम थर्ड सेमिस्टरचा ऑडिटिंग विषयाचा पेपर हा २९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात घेण्यात येणार आहे.  तर याच तारखेला सकाळी ९ ते ११ या वेळात फोर्थ सेमिस्टरचा कंम्पलसरी इंग्लिशचा पेपर वेळापत्रकात दर्शविण्यात आला आहे. 

फोर्थ सेमिस्टरच्या एखाद्या विद्यार्थ्याचा थर्ड सेमिस्टरचा ऑडिटिंग विषय बॅंक असेल तर त्याने दोन्ही पेपरला उपस्थित कसे राहायचे? वेळापत्रकातील या घोळामुळे बी. कॉमचे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. परीक्षांच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या चुका सकाळने परीक्षा नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिल्या असता, त्यांनी तत्काळ चौकशीची सुरू करून बी. कॉमच्या वेळापत्रकाची दखल घेतली.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News