अमरावती विद्यापीठाची 'आचार्य' पदवी स्मिता अलोणी यांना घोषित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील संगीताच्या विद्यार्थिनी स्मिता संदीप अलोणी 
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संगीतातील आचार्य पदवी घोषित केली आहे.
  • गुरु आणि गायक कलाकार म्हणून प्रसिद्धी पावलेले, अनेक संगीत महोत्सवत त्यांचा सहभाग होता.

यवतमाळ: येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील संगीताच्या विद्यार्थिनी स्मिता संदीप अलोणी यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संगीतातील आचार्य पदवी घोषित केली आहे. त्यांचा विषय होता, 'पं मनोहर कासलीकर यांनी सौंदर्यात्मक दृष्टीने केलेले पारंपरिक बंदिशीतील बदल व त्यांच्या गायकीची सौंदर्यात्मक मीमांसा'. त्यांना डॉ. राजेंद्र देशमुख.यांचे मार्गदर्शन लाभले.

पं. मनोहर कासलीकर हे विदर्भातील नामवंत गायकांच्या यादीत सर्वोच्च स्थान असलेले गायक, ज्यांच्या शास्त्रीय गायकीचा महाराष्ट्रात प्रसार प्रचार झाला. अनेक घरंदाज गायकांच्या गायकीचे विश्लेषणात्मक अध्ययन करून स्वतः ची वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. त्या सौंदर्यात्मक गायकीचे लिखाण करून अभ्यासू विद्यार्थी आणि गायक कलावंतांकरीता संगीत क्षेत्राचे दालन खुले केले.

वझे बुवा, कुमार गन्धर्व, बड़े गुलाम अली खाँ यांच्या गायकीचं सूक्ष्म अध्ययन त्यांच्या गायकीत आढळते. मूळ बंदिशींमध्ये सौंदर्यात्मक बदल करणे त्यांचा आवडीचा विषय होता. स्मिता संदीप अलोणी यांनी पं. कासलीकरांच्या स्वरचित बंदिशी, लेख साहित्य, ध्वनि मुद्रण याद्वारे त्यांच्या गायकीतील मर्म, सौंदर्यस्थळे आपल्या प्रबंधात सादर केले आहे. पं। कासलीकर हे स्वतः उत्तम गुरु आणि गायक कलाकार म्हणून प्रसिद्धी पावलेले, अनेक संगीत महोत्सवत त्यांचा सहभाग होता.

स्मिता संदीप अलोणी या अणे महिलां महाविद्यालयतील संगीतात आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर मुंबई येथून कीर्तन विशारद आहेत. त्यांच्या या यशाबद्दल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिवाकर पांडे, सचिव चंद्रकांत रानडे, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, माजी प्राचार्या डॉ. आशा देशमुख, मार्गदर्शक डॉ राजेंद्र देशमुख, प्रा. डॉ. अर्चना देशपांडे, माणिक कद्रे, आचार्य विवेक गोखले, मंजुश्री सोमण, विनायक भिसे, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे यांनी कौतूक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News