अमोल कोल्हे "राज"भेटीला; या मुद्द्यांवर केली चर्चा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • महाराष्ट्र येणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत देखील तसेच चित्र पाहायला मिळणार का? यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
  • याशिवाय अमोल कोल्हे यांच्या 'राज' भेटीमुळे या चर्चाना आणखी उधाण आले आहे. 

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नवे खासदार अमोल कोल्हे हे राज भेटीला गेले. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.  

महाराष्ट्र येणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत देखील तसेच चित्र पाहायला मिळणार का? यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. याशिवाय अमोल कोल्हे यांच्या 'राज' भेटीमुळे या चर्चाना आणखी उधाण आले आहे. 

शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेचे आढळराव पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या काँग्रेसने अमोर कोल्हे यांस उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली.

अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला होता. कोल्हे यांच्यासोबत मराठा आणि माळी या दोघांची संख्या लक्षणीय आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण गाजली असताना येत्या विधानसभा निवडणुकीत याबाबत काय चित्र पहायला मिळत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News