अमोल कोल्हे म्हणतात,‘छत्रपतींचे मन मावळे वळवू शकत नाहीत’

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

मावळे छत्रपतींचे मन वळवू शकत नाहीत. छत्रपती स्वतः निर्णय घेतात, त्याप्रमाणे मावळे वाटचाल करतात. उदयनराजे हे स्वयंभू असल्याने ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

सातारा : मावळे छत्रपतींचे मन वळवू शकत नाहीत. छत्रपती स्वतः निर्णय घेतात, त्याप्रमाणे मावळे वाटचाल करतात. उदयनराजे हे स्वयंभू असल्याने ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार अमोल कोल्हे यांनी सातारा येथे येऊन त्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. दोघांनी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा केली. बाहेर आल्यानंतर दोघांशी पत्रकारांनी संवाद साधला.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘मी साताऱ्यात आल्यावर नेहमी उदयनराजेंची भेट घेतो. त्याप्रमाणेच आजची ही भेट होती. ते माझे मार्गदर्शक आहेत, मी त्यांचा चाहता आहे.’’ तुमच्याकडून उदयनराजेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, या प्रश्‍नावर कोल्हे म्हणाले, ‘‘मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही. छत्रपती निर्णय घेतात, त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो.’’

महाराजांनी भाजपमध्ये जावे की नाही, या अमोल कोल्हेंना विचारलेल्या प्रश्‍नावर उदयनराजेंनी मध्येच हस्तक्षेप करत ‘महाराजांनी पृथ्वीवर राहावे, असे वाटते,’ असे मिश्‍किलपणे म्हणताच एकच हशा पिकला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News