अमोल कोल्हे करणार "शिवस्वराज्य यात्रे"चे नेतृत्व 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही गावे पूरग्रस्त झाल्याने 6 ऑगस्टला स्थगित करण्यात आली होती.

मुंबई : राज्यातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात सुरू झालेल्या सर्व प्रचार यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्राही स्थगित करण्यात आली होती. आता येत्या 19 ऑगस्टपासून या यात्रेला पुन्हा सुरवात होणार आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही गावे पूरग्रस्त झाल्याने 6 ऑगस्टला स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.  

पूर ओसरल्यानंतर तेथे पुनर्वसनाचे काम सुरू झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरूवात होणार आहे. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांत जाणार असून पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News