अमोल कोल्हेंची एन्ट्री झाली अन् शरद पवारांना भाषण थांबवावं लागलं 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019

जुन्नर येथील उमेदवार अतुल बेनकेसाठी घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत असताना खासदार डॉ.अमोल कोल्हे मंचाच्या दिशेने येत होते, अन् कार्यकर्त्यांनी एकच जयघोष सुरु केला. जयघोषानंतर पवार मंचावर इकडे-तिकडे पाहू लागले. अन स्मित हास्य करत म्हणाले 'कोल्हे आले वाटतं'. कार्यकर्त्यांचा जोश आणि कोल्हेंच्या स्वागताला लागलेलं गीत ऐकून पवारांनी स्वतःचं भाषण थांबवावं लागलं. चला कोण तरी जुन्नरी आला असं पवारांनी उच्चारलं. तेंव्हा कोल्हेंसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुणे: जुन्नर येथील उमेदवार अतुल बेनकेसाठी घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत असताना खासदार डॉ.अमोल कोल्हे मंचाच्या दिशेने येत होते, अन् कार्यकर्त्यांनी एकच जयघोष सुरु केला. जयघोषानंतर पवार मंचावर इकडे-तिकडे पाहू लागले. अन स्मित हास्य करत म्हणाले 'कोल्हे आले वाटतं'. कार्यकर्त्यांचा जोश आणि कोल्हेंच्या स्वागताला लागलेलं गीत ऐकून पवारांनी स्वतःचं भाषण थांबवावं लागलं. चला कोण तरी जुन्नरी आला असं पवारांनी उच्चारलं. तेंव्हा कोल्हेंसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य पिंजून काढत आहेत. यावेळी सभा संपली की जनता आणि कार्यकर्ते त्यांना गराडा घालतात अन् म्हणतात साहेब एकच काम करा? मी विचारात पडतो? एकतर त्यांना स्वतःला उमेदवारी हवी असेल किंवा त्यांच्या नेत्याला उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली नाही याचा ते जाब विचारतील, असं मला वाटायचं. पण ते म्हणायचे तेवढं कोल्हे साहेबांना आमच्याकडे पाठवा. हे ऐकून मी अवाक व्हायचो, असे पवार यावेळी म्हणाले.

शिवरायांच्या भूमीत जन्मलेले कोल्हें कसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेत पहा. मी म्हटलं, भारी आहे राव, जुन्नरकर एकदम लांब गेले आता. नागपूर, नांदेड, कोकण या भागात गेलो की केवळ कोल्हेंनाच मागणी होतेय. नव्या पिढीच्या अंतर्कर्णात शिवबाच्या जुन्नरप्रमाणेच कोल्हेंच जुन्नर ही परिचित असल्याचं दिसून आलं. म्हणूनच आज जनता कोल्हेंच मोठ्या मनाने स्वागत करतायेत, अशी स्तुती पवारांनी केली अन ते पुढे बोलू लागले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News