अमोल कोल्हे यांच्याकडून आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाची खिल्ली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 October 2019

नाशिक येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाची खिल्ली उडवली आहे.

नाशिक येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाची खिल्ली उडवली आहे. शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी केवळ 124 जागा लढवून मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहे.  

युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या कमी जागा आणि बहुमतासाठी आवश्यक 145 जागांचा आकडा याची तुलना केली आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अमोल कोल्हेंनी सरकारच्या कामावरही घणाघाती टीका केली. भाजपवर न केलेल्या कामांचा आणि निष्क्रियतेचा दबाव असल्याचं ते म्हणाले. सरकार जो माणूस बोलतो, त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे, असा आरोपही कोल्हेंनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News