'जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत.' अमोल कोल्हेंचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019

शिवस्वराज्य यात्रेतून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

पंढरपूर : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेपर्यंत पोहोचता यावे यासाठी सध्या राजकीय पक्षांच्या यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजपच्या यात्रेनंतर आता राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत आहे. 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पंढरपूर विभागातील टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. याच शिवस्वराज्य यात्रेतून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

यावर कोल्हे म्हणाले,"माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, ३ वर्षे झाली कर्ज माफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू, पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत. यांच्या खिशातले राजीनामे भिजून गेले पण यांनी राजीनामे काय दिला नाहीत." अश्या रोखठोक भाषेत खासदार अमोल कोल्हे युतीवर ताशेरे ओढले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News