मराठा आरक्षणामुळे शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी; साताऱ्याचा अमित यादव मराठा आरक्षणाचा पहिला ‘लाभार्थी !

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 15 July 2019
  • मराठा आरक्षणाचा पहिला लाभार्थी

  • शेतकऱ्याचा मुलगा क्लास 2 अधिकारीपदी!

सातारा :  राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा केल्यानंतर, त्याचे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. कराड तालुक्यातील काले गावच्या अमित यादवची, स्पर्धा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 2 अर्थात क्लास टू अधिकारीपदी निवड झाली आहे. 

मराठा आरक्षणाचा पहिला लाभार्थी ठरला साताऱ्याचा 

कराडचा अमित यादव हा मराठा आरक्षणाचा सातारा जिल्ह्यातील पहिला लाभार्थी ठरला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर, राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) शिक्षणात 12 आणि नोकरीत 13 टक्के आरक्षण लागू केलं. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील 34 जणांची एसईबीसी प्रवर्गातील 13 टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर  झाल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावचा अमित अरविंद यादव याला मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला.

अमितच्या रुपाने यादव कुटुंबातील पहिलाच व्यक्ती सरकारी नोकरीत रुजू झाला आहे. मराठा आरक्षणामुळे गरजूंना निश्चितच नोकरी आणि शिक्षणात फायदा होईल, असा विश्वास अमितने व्यक्त केला.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करणारं पहिलं खातं ठरलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News