पुन्हा अमीर आणि करीना एकत्र?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • आता या चित्रपटासाठी अभिनेत्री करिना कपूर खानच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
  • याआधी आमिर-करिना ‘थ्री इडियट्‌स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटात एकत्र होते.

अभिनेता आमिर खानने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक बनवण्याची घोषणा केली होती. ‘लाल सिंग चढ्ढा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटात आमिर तर आहेच; मात्र आमिरबरोबर कोणती अभिनेत्री या चित्रपटात झळकणार यावर मात्र प्रश्‍नचिन्ह होते.

आता या चित्रपटासाठी अभिनेत्री करिना कपूर खानच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याआधी आमिर-करिना ‘थ्री इडियट्‌स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटात एकत्र होते. सध्या करिना तिच्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला आहे; तर ‘तख्त’ आणि ‘गुड न्यूज’सारखे चित्रपटही तिच्या हाती आहेत. सध्या ती तीन चित्रपटात व्यस्त असल्याने आमिरच्या चित्रपटात काम करायचे की नाही, याचा निर्णय ती भारतात आल्यानंतर घेईल, अशी चर्चा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News