एमआयटी विद्यार्थ्यांना मिळणार अमेझॉन वेब सर्व्हिसचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • एमआयटी अभियांत्रिकी संस्थेला अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (ए.डब्लू.एस.) प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता दिली आहे.
  • बारा वर्षांपासून अमेझॉन वेब सर्व्हिसेस जगातील दहा लाख ग्राहकांना क्‍लाऊड कॉम्प्युटिंगची सेवा देत आहे.
  • एमआयटी समूहाचे महासंचालक मुनिष शर्मा यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

औरंगाबाद : क्‍लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अमेरिकेच्या अमेझॉन कंपनीने एमआयटी अभियांत्रिकी संस्थेला अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (ए.डब्लू.एस.) प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता दिली आहे. संस्थेच्या दोन प्राध्यापकांना प्रशिक्षक म्हणून तयार केले आहे. 

बारा वर्षांपासून अमेझॉन वेब सर्व्हिसेस जगातील दहा लाख ग्राहकांना क्‍लाऊड कॉम्प्युटिंगची सेवा देत आहे. ग्राहकांमध्ये नवीन स्टार्टअप कंपन्यांपासून मोठया एंटरप्राइज कॉर्पोरेट पर्यंत समावेश आहे. काही देशातील सरकारी संस्था सुद्धा ग्राहकांमध्ये समाविष्ट आहेत. ग्राहकांना अमेझॉन क्‍लाऊडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, आणि आयओटीसारखे आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणणे सहज शक्‍य आहे. म्हणून हे तंत्रज्ञान शिकलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करता येते. एमआयटी विद्यार्थ्यांना अमेझॉनतर्फे सर्टिफिकेशन करण्यासाठी विशेष सवलत प्राप्त झाली आहे. 

संगणक विभागाच्या प्रा. सीमा शिलेदार आणि एमसीए विभागाचे प्रा. अमर मुदिराज यांनी अमेझॉन चे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच सर्टिफिकेशन मिळविले आहे. त्याबद्दल प्राचार्य डॉ निलेश पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. एमआयटी समूहाचे महासंचालक मुनिष शर्मा यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले. एमआयटी-अमेझॉन अकॅडमीचे व्यवस्थापक आणि संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. राधाकृष्ण नाईक आणि एमसीए विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कोंडेकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद सुर्यवंशी यांनी केले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News