शिवरायांच्या तुळजापूर मधील पुतळा उभारणीत भ्रष्टाचार... योगेश केदार यांचा आरोप

यिनबझ टीम
Saturday, 27 July 2019

बेजबाबदार जिल्हाधिकारी दीपा मुधोल यांच्यावर कारवाई करा....योगेश केदार

तुळजापूर - तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामांमध्ये भ्रष्टाचार होत असताना, तेथील 'जिल्हाधिकाऱ्यांची डोळेझाक' वेगळाच संदेश देत आहे. त्या स्वतः प्राधिकरणाच्या अध्यक्ष आहेत आणि प्राधिकारणावरच  जबाबदारी ढकलून स्वतः पळ काढत आहेत. 

मुधोल यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जिल्हा प्रशासनाच्या त्या प्रशासकीय प्रमुख आहेत, जर सरकारी स्तरावर चुकीचं काही होत असेल, तर ती त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. कुणाला विचारून शिवरायांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागातून हलवून, रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यात नेला? पुतळा उभारणीच्या कामासाठी कंत्राटदारांची योग्यता, पडताळून पाहिली गेली का? कंत्राट एकाच्या नावे आणि काम करतोय दुसरा, यामध्ये तपासणी करण्याची जबाबदारी कुणाची? तुळजापुर हे शिवरायांच्या कुलदेवीचं ठिकाण आहे, मग या गावातील शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रात सर्वोत्तम असायला हवा होता, त्यादृष्टीनं तुम्ही काही विचार केला होता का? जर केला असेल तर तो नेमका काय? पैश्यांची कमतरता नव्हती, मग काम दुय्यम दर्जाचं का? अशा प्रश्ना्ंची उत्तरे योगेश केदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्याचा प्रयत्न केला.

ऐका संभाषण...

तुळजापूर तालुक्यातील रहिवासी, छत्रपतींचा मावळा आणि शिवभक्त म्हणून माझा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला देणं ही मॅडमजी तुमची जबाबदारी आहे. 

मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये स्वतः लक्ष घालून, जिल्हाधिकाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी, ही विनंती, याप्रकारचे मत योगेश केदार यांनी व्यक्त केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News