सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून मिटविले मतभेद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019
  • राजकीय नेत्यांपाठोपाठ युवक आघाडीकडून संयोजन,
  • निवडणुकीच्या आठवणींना उजाळा 

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभुमिवर आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यानंतर काल (ता.2) सर्व पक्षीय नेते, पत्रकारांसाठी मिसळ पार्टी झाली होती. त्यापाठोपाठ नेत्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या त्यांचे कार्यकर्ते, युवा आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.3) एकत्र येत मिसळ पार्टी केली. वैचारीक मतभेद असलेत तरी सर्वपक्षीय तरूणाई एकत्र असल्याचा संदेश देतांना आपसामधील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. 

गंगापूर रोडवरील हॉटेल करी लिव्हज्‌ येथे आयोजित या मिसळ पार्टीत सहभागी कार्यकर्त्यांनी निवडणुक काळातील आठवणींना उजाळा दिला. निवडणुक काळात वैचारीक मतभेद असलेत, तरी शहर-जिल्ह्याच्या विकासासाठी युवा नेतृत्वाने एकत्रित राहाण्याची गरज आहे, असा विचार यावेळी मांडण्यात आला. या मिसळ पार्टीला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कॉंग्रेसच्या युवा नेत्या नयना गावित, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, सीमंतिनी कोकाटे, भाजपच्या रश्‍मी हिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, चिन्मय गाडे, भारतीय जनता युवा मोर्च्याचे सचिन हांडगे, ऋषिकेश आहेर, मनसेचे कौशल पाटील, युवासेनेचे प्रचारक व अधिसभा सदस्य अमित पाटील, युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते, अजिंक्‍य चुंबळे, बाळा दराडे, कॉंग्रेसचे किरण जाधव, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. मिसळ पार्टी कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष शाम गोहाड यांनी केले होते. 

 
सर्वपक्षीय युवा समितीची स्थापना 
निवडणुकींनंतर नातेसंबंध सुधरविण्यासाठी आयोजित या मिसळ पार्टीत विविध विषयांवर चर्चादेखील झाली. यावेळी शहरांच्या युवा क्षेत्रासंदर्भात तसेच शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यातून सर्वपक्षीय युवा समिती यावेळी स्थापन करण्यात आली.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News