शरद पवार यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा; राजकीय घडामोडींना वेग
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नसताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी राजकीय नेतेमंडळींची वर्दळ वाढली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणं भुवया उंचावणारं आहे.
विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचं संख्याबळ अपक्षांच्या जोरावर 64 वर पोहोचलं आहे. आतापर्यंत 8 अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.