मित्रपरिवारच परीचे सर्वस्व...!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

परिणिती तिच्या आगामी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटासाठी लंडनला रवाना झाली आहे. या चित्रीकरणामधून वेळ काढत ती इंग्लंडमध्ये खास मित्रमंडळींना भेटण्यासाठी जाणार आहे.

परिणिती चोप्राने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी इंग्लंडमधील मॅंचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्‍समध्ये ड्रिग्री मिळवली. इंग्लंडमध्ये तिचा मोठा मित्रपरिवार आहे.

परि आता तिच्या बिझी शेड्यूलमधून काही वेळ मित्र-मंडळींसाठी देणार आहे. परिणिती तिच्या आगामी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटासाठी लंडनला रवाना झाली आहे. या चित्रीकरणामधून वेळ काढत ती इंग्लंडमध्ये खास मित्रमंडळींना भेटण्यासाठी जाणार आहे.

परिणिती म्हणते, ‘माझे मित्रपरिवारच माझं सर्वस्व आहे. मी माझ्या घरापासून लांब असताना तेच माझी ताकद असतात. आता काही वेळ मी त्यांच्यासाठी काढणार आहे.’ 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News