महाआघाडी करू, अन्यथा स्वबळावर लढू : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • ईव्हीएमबद्दल अनेकांच्या मनात शंका
  • लोकांचा अविश्‍वास लोकशाहीसाठी घातक
  • निवडणूक आयोग मूग गिळून गप्प, राजू शेट्टी यांचा आरोप  

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एकत्रित लढल्यास भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला अद्दल घडवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी एक ऑगस्टपर्यंत महाआघाडीची वाट पाहू; अन्यथा स्वबळावर ‘स्वाभिमानी’ मैदानात उतरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुका या भावनेच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या. राष्ट्रवाद, धर्मवाद हे मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटले. आता निवडणूक झाल्यावर लोकांना देशात बेरोजगारी वाढल्याचे कळले. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे मनसे, ‘वंचित’सहित विरोधकांनी सरकारच्या विरोधात रान पेटवावे, यासाठी त्यांची भेट घेतली.

ईव्हीएमबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  लोकांचा अविश्‍वास लोकशाहीसाठी घातक आहे आणि यावर निवडणूक आयोग मूग गिळून गप्प आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News