आलिया-रणबीरची केमिस्टी् रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बहुचर्चित कपल सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ‘ब्रम्हास्त्र’ आलिया-रणबीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं रिअल लाईफ रिलेशनशिप तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. बी-टाऊनमधील हे बहुचर्चित कपल सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. 

बनारसमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. बनारसमधील चित्रीकरणादरम्यानचे आलिया-रणबीरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये आलिया-रणबीर गंगा नदीच्या किनारी बोटीमध्ये बसलेले दिसत आहेत.

शिवाय या दोघांचे चित्रीकरणादरम्यानचे व्हिडीओही सोशल मीडियावर फिरत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात मौनी रॉय, बिग बी अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

खरंतर ‘ब्रम्हास्त्र’ आलिया-रणबीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News