अक्षयच्या "या" चित्रपटात पाच मोठया अभिनेत्री मुख्य भुमिकेत; पण लव्हस्टोरी नाही

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • या चित्रपटात फक्त अक्षय कुमारचं नाही तर यामध्ये  बॉलिवु़डच्या पाच बड्या अभिनेत्र्या आहेत.
  • या चित्रपटात त्या अक्षयसोबत रोमान्स किंवा नाच - गाणी करणार नाही तर रॉकेट उडवायला त्याची मदत करणार आहेत.

मुंबई : यावर्षी अक्षय कुमारच्या "केसरी" चित्रपटानंतर 2019 मधील दुसरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट फक्त अक्षय कुमारच नाही तर यामध्ये बॉलिवु़डच्या पाच बड्या अभिनेत्री आहेत. या चित्रपटात त्या अक्षय सोबत रोमांन्स किंवा नाच - गाणी करणार नाही तर रॉकेट उडवायला त्याची मदत करणार आहेत. हा सिनेमा मार्स मिशनवर आधारित आहे. फक्त मार्सच नाही तर भारताचा दुस-या ग्रहावर पोहचण्यासाठी प्रेरणादायी हात होता. याला मंगलायन असं नाव देण्यात आलं आहे. 

नुकतच "मिशन मंगल" या चित्रपटाचा टिझर लॉंन्च करण्यात आला आहे. चित्रपटात अक्षय कुमार सोबत विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हादी, आणि नित्या मेनन सारख्या पाच अभिनेत्र्या एकत्र काम करताना टिजरमध्ये दिसुन येत आहेत. ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टिजर येताच मार्सवर जाणारा रोकॅट लॉंन्च होण्याच्या आधी अक्षय कुमार रॉकेटला लॉन्च करण्याचा आदेश देत असल्याची छोटीशी झलक या टिजरमध्ये दिसुन येत आहे.  

अक्षय कुमार या चित्रपटात राकेश धवन यांची भुमिका साकारताना दिसुन येणार आहे तर, विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हादी,  आणि नित्या मेनन या अभिनेत्री त्याला मदत करताना दिसुन येणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधीरित असुन 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News