अक्षय कुमार आणि कतरीना कैफ लवकरच 'या' चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटासाठी एक रोमॅंटिक गाणे चित्रित केले जाणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याला या चित्रपटात रिक्रिएट केले जाणार आहे.

हे रोमॅंटिक गाणे अक्की आणि कॅटवर चित्रित होणार आहे. फराह खान या गाण्याची कोरिओग्राफी करतील. १९९४ मध्ये हे गाणे अक्षय आणि अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर चित्रित केले गेले होते. या गाण्यात अक्की-रविनाचा जबरदस्त रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा या गाण्याची जादू रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News