अक्कीच्या स्टंटचा जलवा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

अक्षय बॅंकॉकमध्ये चित्रीकरण करण्यास फारच उत्सुक होता. तो म्हणतो, ‘मी माझे स्टंट शूट करत असताना फार उत्साही असतो.

‘मी आधी स्टंटमॅन आणि नंतर अभिनेता’ हे खिलाडी अक्षयकुमार प्रत्येक वेळी अगदी ठणकावून सांगतो. शिवाय लाखो प्रेक्षक त्याच्या ॲक्‍शन सीन्स आणि स्टंट पाहण्यास उत्सुक असतात.

अक्की त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही काही स्टंट करताना दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर अक्की हा चित्रपट करतोय. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण बॅंकॉक येथे सुरू झाले. नुकताच चित्रिकरणावेळीचा अक्षयचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये तो बाईक स्टंट करताना दिसत आहे.

अक्षय बॅंकॉकमध्ये चित्रीकरण करण्यास फारच उत्सुक होता. तो म्हणतो, ‘मी माझे स्टंट शूट करत असताना फार उत्साही असतो. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी बॅंकॉकमध्ये राहून खूप काम केले आहे आणि आता पुन्हा एकदा इथेच मी चित्रीकरण करत आहे.’ एकूणच काय; तर अक्कीच्या स्टंटचा जलवा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News