अकबरुद्दीन ओवेसी लंडनमधील रुग्णालयात : प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

हैदराबाद : ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा खा. असदुद्दीन ओवेसी यांचे कनिष्ठ बंधू आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर असून, सध्या त्यांच्यावर लंडनमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी ईद-ए-मिलाफ कार्यक्रमादरम्यान असदुद्दीन यांनीच अकबरुद्दीन यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आज ट्‌विटरवरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. अकबरुद्दीन हे २०११ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय हिंसाचारामध्ये गंभीर जखमी झाले होते.

त्या वेळी झालेल्या झटापटीमध्ये त्यांना गोळी लागली होती, तसेच त्यांच्यावर चाकू हल्लाही करण्यात आला होता. बंदुकीच्या गोळीचे काही तुकडे अद्याप अकबरुद्दीन यांच्या शरीरामध्ये आहेत, तीन दिवसांपूर्वी त्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने लंडन येथे हलविण्यात आले होते. अकबरुद्दीन हे चंद्रायानगुट्टा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मल्खानगिरीचे खासदार रेवंत रेड्डी यांनीही अकबरुद्दीन या प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News