बॉलीवूडकरांना मदत करायला सवड नाही, परंतु सातासमुद्रापार असूनही या मराठी पट्ठ्याने केली न विसरता पूरग्रस्तांना मदत

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

पाणी ओसरत असले तरी आता नव्याने संसार उभं कऱण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. सारेच शक्य की मदत करत आहे. अशातच भारताच फलंदाज अजिंक्य रहाणेने सुद्धा पूरग्रस्तांसाठी भावनिक ट्विट केले आहे. 

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आता शहरांतील पूर ओसरु लागला आहे आणि सर्व पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

पाणी ओसरत असले तरी आता नव्याने संसार उभं कऱण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. सारेच शक्य की मदत करत आहे. अशातच भारताच फलंदाज अजिंक्य रहाणेने सुद्धा पूरग्रस्तांसाठी भावनिक ट्विट केले आहे. 

''आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा,'' असे भावनिक ट्विट करत त्याने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News