‘चाणक्‍य’साठी लव रंजनला अजयचा नकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019

चाणक्य चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेळ देता यावा म्हणून अजयने दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटामधून काढता पाय घेतला आहे.

 नुकतेच या वर्षी प्रदर्शित  झालेल्या अभिनेता अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’, ‘दे दे प्यार दे’ चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या चित्रपटांनी बॉक्‍सऑफिसवर बऱ्यापैकी कमाईही केली.अजयकडे बॉलीवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘चाणक्‍य’. 

चाणक्य चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेळ देता यावा म्हणून अजयने दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटामधून काढता पाय घेतला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका अजय साकारणार होता. याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. सध्या अजय ‘चाणक्‍य’च्या तयारीमध्येच मग्न आहे. आता लव रंजनच्या या चित्रपटात अजयची जागा कोण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News